* नगराध्यक्षपद अनुसूचित जाती करीता राखीव
अमरावती, 17 ऑक्टोबर (हिं.स.)
नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण 'अनुसूचित जाती' अर्थात एच सी प्रवर्गासाठी निघाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास इच्छूकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. देवी पावली, असा भास त्यांना होत आहे, कोणत्याही प्रवर्गातील उमेदवाराला निवडणूक लढविता येणार नसल्यामुळे अनुसूचित जातीच्या इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षापुढे पेच निर्माण होण्या्ची शक्यता आहे.अनेकदा विशिष्ट प्रवर्गासाठी अध्यक्षपद आरक्षित झाल्यावर तीव्र इच्छा असताना अनेकांना निवडणूक लढता येते. पण नगराध्यक्षपदाचे आरक्षण यावेळी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निघाल्यामुळे ही संधी आपल्यालाच मिळावी, यासाठी अनेकजण सक्रिय झाले आहेत. राजकीय पक्ष व इच्छुकांकडून नव्या समीकरणाला सुरुवात झाली आहे. अनेक वर्षानंतर थेट नागरिकांमधून नगराध्यक्ष निवडले जाणार आहे. त्यामुळे निवडनुकीच्या काळात नाही'तर इतर वेळेसही जास्तीत जास्त चांगला जनसंपर्क ठेवणाऱ्या उमेदवाराला फायदा होणार आहे. यातच इच्छुकांची वाढती संख्या पाहता सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे पुन्हा एकदा आपली 'ताकद आजमावतात की एकमेकांशी हातमिळवणी करून निवडणुकीला सामोरे जातात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
६ ऑक्टोबर रोजी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यातच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद निघाल्याचे कळताच खुल्या प्रवर्गातील ' उमेदवारासहसर्वांच्या आनंदाला ब्रेक लागले सध्या दिवाळीची धामधुम सरू असून ही कोणीही अन्य विषयावर बोलताना दिसून येत नाही. त्यामुळे आता सामना चांगलाच रंगणार ' हे वाक्य सर्वांच्या तोंडातून निघत आहे. मागील निवडणुकीत अनुसूचित जाती प्रभागातून निवडून आलेल्या काहीं माजी, तर काही विद्यमान सदस्यांच्या आशा यामुळे पल्लवीत झाल्याचे दिसून येत आहे.याशिवाय पंचवार्षिक प्रमाणे यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येत आहे. आता राष्ट्रीय' पक्षाकडून कुणाला तिकीट मिळते, कुणाला अपक्ष मैदानात उतरावे लागते, यावरही बरीच गणिते अवलंबून राहणार आहे.
इच्छुक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा खर्च वाया
नगराध्यक्ष आरक्षण निघण्याच्या आधी अनेक इच्छुक उमेदवारांनी मीच नगराध्यक्ष होणार असल्याने लाखो रुपये खर्च करून शूभेच्छाचे बॅनर लाऊन प्रचार केला होता मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती वर्गाचे निघाल्यामुळे इच्छुक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना ब्रेक लागला असून झालेला खर्च वाया गेला असल्याचे बोलल्या जात आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी