पुणे, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिवाळीनिमित्त सोमवारपासून (ता.२०) ते शनिवारपर्यंत (ता. २५) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज बंद राहणार आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त सरकारी, निमसरकारी कार्यालयांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी धनत्रयोदशी निमित्त शासकीय सुट्टी, मंगळवारी लक्ष्मीपूजन, बुधवारी बलिप्रतिपदेनिमित्त शासकीय सुट्टी, बुधवारी भाऊबीजेनिमित्त शासकीय सुट्टी असणार आहे आणि विद्यापीठाच्या दिनांक २२ मार्च, २०२५ रोजी आयोजित अधिसभेच्या पूर्वतयारीसाठी शनिवार आणि रविवार (दिनांक १५ ते १६ मार्च, २०२५) रोजी विद्यापीठ कार्यालय सुरु होते त्याची पर्यायी सुट्टी गुरुवार आणि शुक्रवार (दिनांक २४ ते २५ ऑक्टोबर, २०२५) रोजी असणार आहे. तसेच २६ ऑक्टोबर रोजी रविवारची सुट्टी आहे.
शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी व रविवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी नियमित सुटी आहे. दिवाळीच्या सुटीनंतर सोमवारपासून (ता.२७) विद्यापीठातील कार्यालयांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु