हिंगोली, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्हा परिषद सेस योजना सन 2025-26 मधून 20 टक्के मागासवर्गीय कल्याण निधी अंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीकरिता अर्थसहाय्य पुरवणे या योजनेसाठी लाभार्थीचे पंचायत समिती स्तरावरून अर्ज मागविण्यात आले होते. पात्र लाभार्थ्यांमधून ईश्वर चिठ्ठीव्दारे 80 लाभार्थीची निवड करून निवड यादी जिल्हा परिषद, पंचायत समिती व हिंगोली जिल्ह्याच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव अनुदान मागणी अर्ज, लॅपटॉप खरेदी केल्याची जी.एस.टी.चे बील, लॅपटॉपसह लाभार्थीचा 4x6 आकाराचा कलर फोटो, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या सध्याच्या महाविद्यालयाचे मूळ प्रतीत बोनाफाईड प्रमाणपत्र, लाभार्थ्यांची बँक खात्याच्या पासबुकांची झेरॉक्स प्रत. (खात्यावरील नाव, खाते क्रमांक व आयएफएससी कोड स्पष्ट दिसेल अशा प्रकारचा असावा) व लाभार्थी अथवा त्यांचे आई वडील व पालक यापैकी कोणीही शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचे सरपंच/ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रमाणपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
या योजनेमधून कुटूंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्यात येईल. जर ईश्वर चिठ्ठीद्वारे एका कुटुंबातील दोन व्यक्तींची निवड झाली असेल तर प्रथम निवड झालेल्या लामार्थीना लाभ देण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष लाभ देण्यापूर्वी लाभार्थी हा शैक्षणिक अथवा इतर कारणास्तव अपात्र ठरल्यास त्याऐवजी प्रतीक्षा यादीतील लाभार्थीना प्राधान्यक्रमांने लाभ देण्यात येईल याची नोंद घ्यावी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis