वर्धा : हिंदी विद्यापीठात सायबर सुरक्षेवर विशेष व्याख्यान
वर्धा, १७ ऑक्टोबर (हिं.स.) : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात विश्‍वविद्यालय अनुदान आयोग (यूजीसी) च्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांमध्ये सायबर जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर व्या
हिंदी विद्यापीठात सायबर सुरक्षेवर विशेष व्याख्यान


वर्धा, १७ ऑक्टोबर (हिं.स.) : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात विश्‍वविद्यालय अनुदान आयोग (यूजीसी) च्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांमध्ये सायबर जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन ग़ालिब सभागृहात करण्यात आले.

यावेळी वर्धा जिल्हा आय.टी. सेलचे तज्ज्ञ अंकित जीभे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, ई-मेल किंवा कोणत्याही अ‍ॅपचा पासवर्ड तयार करताना स्वतःचे नाव किंवा जन्मतारखेचा उपयोग करू नये, कारण अशा पासवर्ड्स हॅक होण्याची शक्यता जास्त असते. त्यांनी सुरक्षित डिजिटल वर्तन अंगीकारण्याचे महत्त्व स्पष्ट केले.त्याचप्रमाणे आय.टी. सेलच्या तज्ज्ञ स्मिता महाजन यांनी सोशल मिडियाचा जबाबदारीने वापर कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वापरताना गोपनीयता सेटिंग्सकडे लक्ष देणे, अनोळखी लिंक्सवर क्लिक न करणे आणि वैयक्तिक माहिती शेअर न करणे हे अत्यंत आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. हेमलता गोडबोले यांनी तर स्वागत डॉ. अंजनी कुमार राय यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शोधार्थी उपस्थित होते.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande