मुंबई, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। टीव्हीएस मोटर्सने आपली पहिली अॅडव्हेंचर टूरिंग बाईक अपाचे आरटीएक्स 300 भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे. ही प्रीमियम आणि स्पोर्टी बाईक विशेषतः तरुण रायडर्ससाठी डिझाइन करण्यात आली असून तिची थेट स्पर्धा रॉयल एनफील्ड हिमालयन 440, केटीएम 250 अॅडव्हेंचर आणि येझदी अॅडव्हेंचर सारख्या लोकप्रिय बाईक्सशी होणार आहे. अपाचे आरटीएक्स 300 ची किंमत रु. 1.99 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही बाईक कंपनीच्या नवीन RT-XD4 इंजिन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये रेसिंग परफॉर्मन्स आणि लाँग-राइड कम्फर्टचा उत्तम संगम साधण्यात आला आहे.
या इंजिन प्लॅटफॉर्ममध्ये चार अत्याधुनिक ड्युअल टेक्नॉलॉजीजचा समावेश आहे – ड्युअल ओव्हरहेड कॅम आणि डाउनड्राफ्ट पोर्ट, ड्युअल ऑइल पंपसह स्प्लिट चेंबर क्रॅंककेस, ड्युअल कूलिंग जॅकेट सिलिंडर हेड आणि ड्युअल ब्रीदर सिस्टम. बाईकमध्ये 299.1cc सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड DOHC इंजिन आहे, जे 36PS पॉवर आणि 28.5Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट-अँड-स्लिपर क्लच देण्यात आले आहे. रायडरसाठी चार राइड मोड्स – Urban, Rain, Tour आणि Rally उपलब्ध असून वेगवेगळ्या हवामान व रस्त्याच्या परिस्थितीनुसार परफॉर्मन्स समायोजित करता येतो.
हँडलिंग आणि स्टेबलायझेशनसाठी अपाचे आरटीएक्स 300 मध्ये पुढील बाजूस इनवर्टेड कार्ट्रिज फोर्क आणि मागील बाजूस मोनो-ट्यूब फ्लोटिंग पिस्टन सस्पेंशन देण्यात आले आहे. लाइटवेट स्टील ट्रेलिस फ्रेममुळे बाईक उत्तम बॅलन्स आणि डायनॅमिक परफॉर्मन्स देते. लो सीट हाइट आणि चांगला पॉवर-टू-वेट रेशो हे तिचे मुख्य आकर्षण ठरते, जे सर्व प्रकारच्या रस्त्यांवर आरामदायी राइडिंग अनुभव देते.
डिझाइनच्या बाबतीत अपाचे आरटीएक्स 300 पूर्णपणे रॅली-इन्स्पायर्ड आहे. I-शेप LED हेडलॅम्प, LED इंडिकेटर्स, मस्क्युलर फ्युएल टँक, ट्रान्सपेरंट विंडस्क्रीन आणि बीक-स्टाइल फ्रंट या वैशिष्ट्यांमुळे ती एक दमदार ऑफ-रोड बाईक दिसते. या बाईकचे रंग पर्याय Pearl White, Viper Green, Lighting Black, Metallic Blue आणि Tarn Bronze असे आहेत.
फीचर्सच्या दृष्टीने अपाचे आरटीएक्स 300 आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक तंत्रज्ञानयुक्त बाईक मानली जात आहे. यात फुल-कलर TFT डिस्प्ले दिला असून त्यावर कॉल आणि SMS अलर्ट, स्पीड, GoPro कंट्रोल आणि मॅप मिररिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, ABS मोड्स (Rally, Urban, Rain), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि क्रूझ कंट्रोलसारखी ॲडव्हान्स वैशिष्ट्ये दिल्यामुळे ही बाईक अॅडव्हेंचर टूरिंग सेगमेंटमध्ये एक नवा मापदंड निर्माण करते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule