लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।स्पर्धेत यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण कष्टाशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन ऑलिंपियन वीरधवल खाडे यांनी राजर्षी शाहु महाविद्यालयाच्या संकुलात राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी बोलताना त्यांनी लातूर येथे प्रथमच या स्पर्धा होत असून यामुळे लातूर जिल्ह्यात जलतरणाची संस्कृती रुजून भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, सचिव डॉ. अनिरुध्द जाधव, उपाध्यक्ष पी. आर. देशमुख तसेच सदस्य गोपाळ शिंदे, अड. सुनिल सोनवणे, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अनिरुध्द बिराजदार यांनी केले.
निकालः- १४ वर्षाखालील मुले- १) २०० मी. फ्रिस्टाईल- शौर्या कोंढरे, कोल्हापूर (२.१६.६४) विहान सोरटे, पुणे अरव महाजन, मुंबई २) २०० मी. बटरफ्लाय- कबीर सोनवले, मुंबई (२.३५.१७) रुद्र वाडकर, शिवछत्रपती क्रीडापीठ आयुष राजापूरे, पुणे ३) ४ x १०० मी. फ्रिस्टाईल रिले- शिवछत्रपती क्रीडापीठ (४.४४.२८) मुंबई , नागपूर
१४ वर्षाखालील मुली-१) २०० मी. फ्रिस्टाईल- सलोनी साळुंखे, पुणे (२.२४.६४), काईजा शंकर, पुणे, लक्ष्मी सर्फराजु, मुंबई २) २०० मी. बटरफ्लाय- श्रीनिती यश मुंबई (२.४४.५९) काईजा शंकर, पुणे सलोनी साळुंखे, पुणे ३) ४ x १०० मी. फ्रिस्टाईल रिले- पुणे (५.२५.४०) कोल्हापूर, नागपूर
१७ वर्षाखालील मुले-१) २०० मी. फ्रिस्टाईल- अर्चित मोरवेकर, मुंबई (२.०२.१४) रिशी भगत, कोल्हापूर वरद मारणे, पुणे २) ८०० मी. फ्रिस्टाईल- रिशी भगत, कोल्हापूर (९.१५.१३) ओमर जलाल, मुंबई चैतन्य शिंदे, शिवछत्रपती क्रीडापीठ ३) २०० मी. बटरफ्लाय- शाल्व मुळे, पुणे (२.१५.६२) ओझस पिंगळे, पुणे राजविरसिंग रहाल, नागपूर ४) ४ x १०० मी. फ्रिस्टाईल रिले- मुंबई (४.१०.३२) शिवछत्रपती क्रीडापीठ, अमरावती
१७ वर्षाखालील मुली-१) २०० मी. फ्रिस्टाईल- अन्वी देशवाल, मुंबई (२.१६.७५) मोनर्वा पती, पुणे, अर्ना आगरवाल, मुंबई २) २०० मी. बटरफ्लाय- आदिती हरीयान, मुंबई (३.००.२९) श्वेता कांबळे, मुंबई अनन्या बिरारी, शिवछत्रपती क्रीडापीठ ३) ४ x १०० मी. फ्रिस्टाईल रिले- नागपूर (६.०८.०८), कोल्हापूर, अमरावती
१९ वर्षाखालील मुले-१) २०० मी. फ्रिस्टाईल- ओम साट्म, मुंबई (१.५९.७१), अजिंक्य नरवाडे, शिवछत्रपती क्रीडापीठ, भक्तीश कुमरे, नागपूर २) २०० मी. बटरफ्लाय- श्वेत पुजारी, मुंबई (२.२१.३८), सोहम वाळके, शिवछत्रपती क्रीडापीठ, रनबीरसिंग गौर, नागपूर ३) ४ x १०० मी. फ्रिस्टाईल रिले- अमरावती (४.२१.२२) शिवछत्रपती क्रीडापीठ, पुणे
१९ वर्षाखालील मुली- १) २०० मी. फ्रिस्टाईल- वंशिका परती, मुंबई (२.२२.८७), अन्विता देशपांडे, कोल्हापूर, मायरा जाधवानी, मुंबई २) ८०० मी. फ्रिस्टाईल- मायरा जाधवानी, मुंबई (११.०९.९८), सेजल पाटील, शिवछत्रपती क्रीडापीठ, स्नेहा लोकरे, मुंबई ३) २०० मी. बटरफ्लाय- निर्मयी आंबेटकर, मुंबई (२.२९.९१) त्विषा दिक्षीत, पुणे तन्वी धुर्वे, नागपूर ४) ४ x १०० मी. फ्रिस्टाईल रिले- मुंबई (५.२०.५४) पुणे, नागपूर.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis