छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्ह्यामध्ये दीपावलीचा पहिला दिवस व शुभारस अत्यंत उत्साहात संपन्न झाला आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी गोमातेचे पूजन केले.शहर आणि जिल्ह्यात नागरिकांच्या वतीने गोमातेचे पूजन करण्यात आले.
सनातन संस्कृतीची संवर्धिनी असलेल्या गोमातेच्या पूजनातून दीपावलीचा मंगलमय प्रारंभ केला.
वसुबारस हा गोधन पूजनाचा व पशुधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.गाय आणि वासराच्या अंगी असलेले स्नेहा, ममत्व आपल्या सर्वांच्या जीवनात यावं, अशी अपेक्षा आमदार अनुराधा चव्हाण यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis