वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय २४ ऑक्टोबर रोजी राहणार बंद
मुंबई, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)। मुंबईकरांना व विशेषतः बच्चे कंपनीला दिवाळी सुटीचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने घेता यावा, या उद्देशाने दिवाळी कालावधी दरम्यान असणा-या सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय ना
Veermata Jijabai Bhosale Botanical Garden and Zoo  Will remain


मुंबई, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)। मुंबईकरांना व विशेषतः बच्चे कंपनीला दिवाळी सुटीचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने घेता यावा, या उद्देशाने दिवाळी कालावधी दरम्यान असणा-या सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘बलिप्रतिपदा दीपावली पाडवा’ निमित्त बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ व ‘भाऊबीज’ निमित्त गुरुवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सार्वजनिक सुटी आहे. मात्र, असे असले तरी, सदर दोन्ही दिवशी अर्थात बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ व गुरुवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे; तर शुक्रवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी बंद असणार आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे कळवण्यात येत आहे.

भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते.

सबब, या ठरावानुसार, बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ व गुरुवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande