लातूरच्या प्रस्तावित स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या वाढीव निधीसाठी पाठपुरावा करणार
लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूरातील प्रस्तावित स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या मंजूर कामासाठी वाढीव निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. व्हीएस पॅंथर्स युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विनोद खटके व
अ


लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

लातूरातील प्रस्तावित स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या मंजूर कामासाठी वाढीव निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

व्हीएस पॅंथर्स युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विनोद खटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेऊन लातूरातील प्रस्तावित स्टॅच्यू ऑफ नॉलेज संदर्भातील त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.

लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 75 फुटाचा भव्य पुतळा उभारण्यासाठी 10 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला, पण त्या कामाला अद्याप प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने लातूरच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधून सदरील कामाला तात्काळ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी विनंती केली.

स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या उर्वरित कामासाठी आणखीन 12 कोटी रुपये निधी लागणार असून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करवून घेऊन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा सुद्धा करणार आहे. असे आमदारा अभिमन्यू पवार यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande