मुंबई, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या वतीने शुक्रवारी (दि. १७) राजभवनातील कर्मचारी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी, कंत्राटी कामगार व इतर कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करण्यात आले.
राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते यावेळी मिठाई वाटप करण्यात आले.
यावेळी राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे यांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर