‘हिप्परगा’ तलावात बोटिंग, परिसरात बगीचा अन्‌ पक्षी निरीक्षण केंद्र
सोलापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर-तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा गावाजवळील एकरुख तथा हिप्परगा तलावाची नोंद वर्ल्ड हेरिटेज म्हणून झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९० वर्षांपूर्वीच्या धामापूर तलावानंतर हिप्परगा तलावाची त्यात नोंद झाली आहे. आता ह
‘हिप्परगा’ तलावात बोटिंग, परिसरात बगीचा अन्‌ पक्षी निरीक्षण केंद्र


सोलापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

सोलापूर-तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा गावाजवळील एकरुख तथा हिप्परगा तलावाची नोंद वर्ल्ड हेरिटेज म्हणून झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९० वर्षांपूर्वीच्या धामापूर तलावानंतर हिप्परगा तलावाची त्यात नोंद झाली आहे. आता हिप्परगा तलावात बोटिंग, परिसरात पक्षी निरीक्षण केंद्र, बगीचा अशा जागतिक पर्यटनवाढीच्या सुविधा तयार केल्या जाणार आहेत. त्यासाठी सोलापूरचा पाटबंधारे विभाग ‘युनेस्को’कडे प्रस्ताव देणार आहे.

कृष्णा खोऱ्यातील भीमानदीची उपनदी असलेल्या अदिला नदीवर ब्रिटिशांच्या काळात १८७१ मध्ये हिप्परगा गावाच्या परिसरात एकरुख तलाव बांधण्यात आला. हा तलाव एक हजार २२९ हेक्टरवर (३०७२ एकर) पसरला आहे. तीन वर्षांत बांधलेल्या या तलावामुळे हिप्परगा परिसरातील सुमारे ३५ गावांना, शेतीला मोठा आधार होता. पुढे सोलापूर शहरासाठीही तेथून पाइपलाइन करून पाणी आणण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande