नांदेडच्या चेनापूर तांडा गावात विहिरीच्या पाण्यामुळे १०० जणांना विषबाधा
नांदेड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा येथील जवळपास १०० नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. नागरिकांनी गावातील विहिरीतील पाणी पिल्यामुळे विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सकाळपासून गावातील काही नागरिकां
अ


नांदेड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा येथील जवळपास १०० नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

नागरिकांनी गावातील विहिरीतील पाणी पिल्यामुळे विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सकाळपासून गावातील काही नागरिकांना अतिसार आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. यानंतर त्यांना अर्धापूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा या गावात विहिरीतील पाणी पाईप लाईनने पुरवठा केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा पाणी पुरवठा केला जात आहे, परंतु लाईप लाईन काही ठिकाणी जिर्ण झाल्याने लिकेज होत आहे.विहिरीतून पुरवठा केलेले हे पाणी पिल्यानंतर अचानक लोकांच्या पोटात दुखून कळ येऊन अतिसार सुरू झाला. गावातील जवळपास १०० नागरिकांना हा त्रास सुरू झाल्याने हि विषबाधा असल्याचे पुढे आले. तातडीने नागरिकांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृतीखालावल्याने त्यांना अर्धापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले ५० जणांची प्रकृती स्थिर असली तरी दक्षता म्हणून त्यांनीही ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना उपचाराअंती घरी पाठविण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande