लातूर - अभय भुतडा फाउंडेशन च्या वतीने अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना ५२ लाखांची भरीव मदत
लातूर, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। उदगीर–जळकोट विधानसभा मतदारसंघात एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या विक्राळ अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनधन आणि पशुधनाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे शेतमाल, जनावरांचे चारापाणी, घरे तसेच दै
अ


लातूर, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। उदगीर–जळकोट विधानसभा मतदारसंघात एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत झालेल्या विक्राळ अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनधन आणि पशुधनाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे शेतमाल, जनावरांचे चारापाणी, घरे तसेच दैनंदिन उपजीविकेची साधने उद्ध्वस्त झाली होती. या संकटाच्या काळात अनेक कुटुंबे हतबल अवस्थेत होती.

या पार्श्वभूमीवर लातूरचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योगपती अभय भुतडा यांना मदतीचे आवाहन केले व ती त्यांनी तात्काळ मान्य करुन सामाजिक बांधिलकी जपत एक अनुकरणीय उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या 'अभय भुतडा फाऊंडेशन' च्या वतीने उदगीर – जळकोट मतदारसंघातील आपत्तीग्रस्त नागरिकांना एकूण ₹५२ लाखांची भरीव आर्थिक मदत जाहीर केली

ही मदत पारदर्शक पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून, या मदतीचा लाभ शेकडो शेतकरी आणि अतिवृष्टीबाधित कुटुंबांना मिळणार आहे. असे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले

या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजाला दिलासा देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande