लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
उदगीर येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण लवकरच होणार असल्याची माहिती जळकोट उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे. या संदर्भात एक पूर्वतयारी बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उदगीर शहरात भव्य पुतळा असावा अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. त्यांच्या भावनांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रति असलेल्या सन्मानाचा आदर करून उदगीर येथे भव्य पुतळा उभारण्यात आला.
या पुतळ्याचे अनावरण तसेच शहरातील विविध विकास कामाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त पूर्व तयारी बैठक शासकीय विश्रामगृह उदगीर येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला उपस्थित राहत अनावरण आणि लोकार्पण सोहळ्याचे नियोजन केलं यावेळी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis