नाशिक - अशोका मेडिकव्हर मध्ये राज्यातील पहिले ट्रॉमा, अ‍ॅक्युट सर्जरी विभाग सुरू
नाशिक, 18 ऑक्टोबर, (हिं.स.) - जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नाशिकने राज्यातील पहिले ट्रॉमा आणि अ‍ॅक्युट सर्जरीसाठी समर्पित स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. ट्रॉमा केअर क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हा विभाग अपघातग्
अशोका मेडिकव्हर मध्ये राज्यातील पहिले ट्रॉमा, अ‍ॅक्युट सर्जरी विभाग सुरू


नाशिक, 18 ऑक्टोबर, (हिं.स.) - जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नाशिकने राज्यातील पहिले

ट्रॉमा आणि अ‍ॅक्युट सर्जरीसाठी समर्पित स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. ट्रॉमा केअर क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हा विभाग अपघातग्रस्त आणि गंभीर इजा झालेल्या रुग्णांना वेळेवर, एकत्रित आणि समन्वित उपचार देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे.

भारतामध्ये दरवर्षी सुमारे ४.६ लाख रस्ते अपघातांमध्ये १.५ लाखांहून अधिक मृत्यू आणि ३ लाखांहून अधिक गंभीर जखमी होतात. तज्ज्ञांच्या मते, यातील सुमारे ५०% मृत्यू वेळेवर प्रतिसाद आणि योग्य ट्रॉमा व्यवस्थापनामुळे टाळता येऊ शकतात.नाशिकसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्ये, ट्रॉमा केवळ महामार्गावरील अपघातांपुरता मर्यादित नाही. जिन्यावरून पडणे, बांधकामस्थळी झालेल्या दुर्घटना, घरगुती अपघात किंवा कामाच्या ठिकाणी झालेल्या इजा — या सर्व घटनांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यास जीव धोक्यात येऊ शकतो.अशोका मेडिकव्हरच्या ट्रॉमा विभागाचे नेतृत्व सुप्रसिद्ध ट्रॉमा आणि अ‍ॅक्युट सर्जन डॉ. शेखर चिरमाडेकरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलने नाशिक शहरात एक सुसंगत ट्रॉमा प्रतिसाद प्रणाली विकसित केली आहे, जी पहिल्या प्रतिसादापासून पुनर्वसनापर्यंत रुग्णांना अखंड उपचार सेवा पुरवते.“शहरांमध्ये अनेकदा ट्रॉमा ओळखलेच जात नाही, जोपर्यंत ते गंभीर होत नाही,” . “लवकर ओळख आणि वेळेवर हस्तक्षेप केल्यास अनेक जीव वाचू शकतात असेही डॉ. चिरमाडे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande