नागरिकसेवेची भावना, हीच  महापालिकेची खरी ताकद - तृप्ती सांडभोर
पुणे, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। “महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे केवळ प्रशासनाचे घटक नाहीत, तर शहर विकासाचे प्रेरक बिंदू आहेत. खेळातून संघभावना, शिस्त आणि उत्साह वाढतो; हेच गुण उत्तम नागरिकसेवेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आरोग्य टिकवा, खेळत राहा आणि जन
नागरिकसेवेची भावना, हीच  महापालिकेची खरी ताकद - तृप्ती सांडभोर


पुणे, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। “महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे केवळ प्रशासनाचे घटक नाहीत, तर शहर विकासाचे प्रेरक बिंदू आहेत. खेळातून संघभावना, शिस्त आणि उत्साह वाढतो; हेच गुण उत्तम नागरिकसेवेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आरोग्य टिकवा, खेळत राहा आणि जनसेवेतील कार्य अधिक प्रभावी बनते. या उपक्रमांमधून महापालिका परिवारातील एकजूट, उत्साह आणि कार्यक्षमतेचे दर्शन घडले. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्यदायी शरीर, समर्पित मन आणि नागरिकसेवेची भावना हीच महानगरपालिकेची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात सांडभोर यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सह आयुक्त मनोज लोणकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बन्सल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande