व्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला सहन केल्या जाणार नाही - सूर्यकांत विश्वासराव
परभणी, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। व्यक्तीस्वातंत्र्य हा भारतीय संविधानाने बहाल केलेला मुलभुत अधिकार असुन त्या वरील शासकिय- प्रशासकिय हल्ला सहन केल्या जाणार नाही असे रोखठोक प्रतिपादन मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव यांनी केले.अतिथी सभ
व्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला सहन केल्या जाणार नाही : सुर्यकांत विश्वासराव


परभणी, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। व्यक्तीस्वातंत्र्य हा भारतीय संविधानाने बहाल केलेला मुलभुत अधिकार असुन त्या वरील शासकिय- प्रशासकिय हल्ला सहन केल्या जाणार नाही असे रोखठोक प्रतिपादन मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव यांनी केले.अतिथी सभागृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

ज्ञानोपासक विद्यालय टाकळी ता.मानवत येथील विद्यार्थी प्रिय शिक्षक देविदास शिंपले यांनी समाज माध्यमावर शासकिय धोरणांवर टिका केली म्हणुन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी वरीष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित केली आहे त्या विरुध्द जाब विचारण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिका-यानी शिक्षणाधिकारी डाॅ.सविता बिरगे यांना निवेदण सादर केले. या वेळी मराठवाडा शिक्षक संघाचे ऊपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे,प्रा.डाॅ.ऊमाकांत राठोड (सिनेट सदस्य),भाई चंद्रकांत चव्हाण (सचिव,संभाजी नगर ) यांच्यासह केंद्रिय कार्यकारिणी सदस्य ऊपस्थित होते. शिक्षणाधिकारी (मा.) यांनी या प्रकरणी जनभावना शासना पर्यंत पोंहचविण्याचे आश्वासन दिले.. या वेळी बोलतांना परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद यांनी शिक्षकांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा विघातक पायंडा सरकारने निर्माण करून असंतोषाचे धनी होऊ नये अन्यथा संविधानिक मार्गाने व्यापक आंदोलन ऊभे करण्यात येईल असे मत व्यक्त केले.

निवेदणावर सचिव निशांत हाके, महिला आघाडी अध्यक्ष दुर्गा देशमुख,केंद्रिय सदस्य बी.टी.सांगळे,विक्रम कदम,ऊपाध्यक्ष अमित मोगल,नारायण कदम,प्रल्हाद कांबळे,विजय धापसे,रमेश सुर्यवंशी,शालीग्राम पंचांगे,प्रकाश बोरसुरीकर,देविदास शिंपले, आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande