मुंबई, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅक्सिस फायनान्स लिमिटेडने (एएफएल) धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अॅक्सिस फायनान्स शक्ती, मायक्रो लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी (मायक्रो एलएपी) उत्पादन लाँच करण्याची घोषणा केली. व्यावसायिक तसेच वैयक्तिक गरजांसाठी योग्य असे आर्थिक पर्याय उपलब्ध करून देऊन ग्राहकांना सक्षम करण्यासाठी हे उत्पादन डिझाइन केले आहे.
अॅक्सिस फायनान्स शक्ती हे उत्पादन, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील अत्यंत छोटे उद्योजक, व्यापारी आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती तसेच पगारदार ग्राहकांना सेवा देण्यासाठी डिझाइन केले आहे. योग्य कागदपत्रांमुळे काम अडणार नाही, याची देखील पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. विविध व्यवसाय प्रोफाइलसाठी हे उत्पादन क्रेडिटची औपचारिक उपलब्धता वाढविण्याचा प्रयत्न करते. सोप्या प्रक्रिया, कालावधीचा लवचिक पर्याय आणि तारण म्हणून विस्तृत श्रेणीतील मालमत्तांच्या स्वीकृतीसह, अॅक्सिस फायनान्स शक्ती ग्राहकांना व्यवसाय वाढीसाठी, खेळत्या भांडवलाची गरज किंवा वैयक्तिक उद्दिष्टांसाठी त्यांच्या मालमत्तेचा वापर करण्यास सक्षम करते. उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये ग्राहक-केंद्रित आणि सानुकूलित आर्थिक उपाय प्रदान करण्याच्या एएफएलच्या वचनबद्धतेला हे बळकटी देते.
या लाँचिंगबद्दल अॅक्सिस फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ, साई गिरिधर म्हणाले, “धनत्रयोदशीला अॅक्सिस फायनान्स शक्तीचे लाँचिंग होणे म्हणजे आर्थिक समावेशन आणि ग्राहक-केंद्रित उपायांसाठी असलेली आमची वचनबद्धता सातत्याने अधोरेखित होते आहे. औपचारिक कर्ज मिळविण्यात अनेकदा आव्हानांचा सामना करावा लागतो, असे छोटे उद्योजक, व्यापारी आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना सेवा देण्यासाठी या उत्पादनाची रचना केली आहे. लवचिक कालावधी, व्यापक तारण स्वीकृती आणि सरलीकृत दस्तऐवजीकरण देऊन, शक्ती ग्राहकांना व्यवसाय आणि वैयक्तिक वाढीसाठी त्यांच्या मालमत्तेची क्षमता उघड करण्यास सक्षम करते. आम्हाला विश्वास आहे की, हा उपक्रम क्रेडिट गॅप भरून काढण्यास आणि उदयोन्मुख विभागांमध्ये प्रगती करण्यास मदत करेल.”
ते पुढे म्हणाले, तंत्रज्ञान आणि कार्यक्षम प्रक्रियांचा वापर करून, आम्ही उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आमचा विस्तार करण्याचे आणि प्रत्येक ग्राहकाला उत्तम अनुभव देण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, अॅक्सिस फायनान्सने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि कमी उत्पन्न गटासाठी (एलआयजी) घरमालकी अधिक सुलभ करण्यासाठी दिशा गृह कर्ज सादर केले. त्याच उपक्रमाच्या आधारे पुढे जात, अॅक्सिस फायनान्स शक्ती ७५ लाखांपर्यंत लहान रकमेचे मालमत्ता कर्ज देते जे ग्राहकांना वैयक्तिक आणि व्यवसाय वाढीसाठी आर्थिक संधी उपलब्ध करून देते.
सुरक्षित गृहकर्ज उत्पादनांमध्ये अॅक्सिस फायनान्स बराच काळ असून या क्षेत्रात ते चांगलेच यशस्वी आहेत. यासाठी विद्यमान प्रणाली, प्रक्रिया, तंत्रज्ञान, प्रतिभा, अंडररायटिंग क्षमता आणि मजबूत वितरण या घटकांचा देखील हातभार लागला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule