लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.) भारतीय जनता पक्षाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित कव्हेकर यांनी उदगीर शहर आणि तालुक्याचा दौरा केला भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बाबींसाठी हा दौरा झाला यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाची माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि विविध विषयांवर चर्चा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून संघटनात्मक बाबीसाठी दौरा सुरू आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे लातूर शहर अध्यक्ष अजित कव्हेकर हे उदगीर येथे दाखल झाले होते. उदगीर दौऱ्यावर असताना भाजपचे माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे यांच्या घरी भेट दिली. यावेळी स्नेहपूर्वक सत्कार करण्यात आला. विविध विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी मा. जि.प. अध्यक्ष राहुलभैय्या केंद्रे , तालूका अध्यक्ष श्री सुनिल सावळे , शहरराध्यक्ष अमोल अणकल्ले , नगरसेवक गणेश गायकवाड , शहर सरचिटणीस आनंद साबणे , युवा शहराध्यक्ष आदित्य कुलकर्णी आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis