बीड जिल्ह्यातील विनायक बोराडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
बीड, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील भालगाव येथे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. विनायक बोराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांचे स्व
fe2da035a85dfcc1431e57f6e0bfd26f_1449203511.jpg


बीड, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील भालगाव येथे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. विनायक बोराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यामुळे आणखी बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षाच्या विचारसरणीवर व नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याची संकल्पना या भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. असे खासदार सोनवणे यांनी सांगितले आहे.यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande