छत्रपती संभाजीनगर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। मिटमिटा गावातील कित्येक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी- कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने व सर्व गावकऱ्यांच्या मदतीने गावातील खुल्या जागेवर पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या बाजूला अनधिकृत जनावराचा गोठा होता.
ज्यामध्ये नेहमी जनावरे बांधलेली असतात त्यामुळे त्यांची घाण , शेण , मळमूत्र हे पिण्याच्या पाण्यात मिसळत होते. परंतु आज भाजप पदाधिकारी व मनपा कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन समज देऊन अनधिकृत गोठा व इतर कचरा घाण काढण्यात आली. जेणेकरून मिटमिटा गावातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा यापुढे होणार नाही.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis