लातूर, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), लातूर ग्रामीण जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ऋषिकेश कराड यांनी लातूर जिल्ह्यातील विविध गावांना भेटी दिल्या.
लातूर ग्रामीण मतदारसंघातील गादवड, तांदुळजा आणि ममदापूर या गावांना भेट देऊन तेथील उत्साही आणि जाणकार युवकांशी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा केली.
युवकांनी अत्यंत सकारात्मकपणे या निवडणुकीचे महत्त्व आणि त्या अनुषंगाने अपेक्षित बदल याबद्दल आपली मते स्पष्टपणे मांडली.
या भेटीदरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), लातूर ग्रामीण जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तिन्ही ठिकाणी गावकऱ्यांनी आणि विशेषतः तरुण साथीदारांनी सत्कार केला. सबका साथ, सबका विकास' या मंत्रावर विश्वास ठेवून, लातूर ग्रामीणचा विकास आणि युवकांना योग्य दिशा देण्याचे कार्य अधिक जोमाने करेन. असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis