नाशिक, 18 ऑक्टोबर (हिं.स.) कोणताही निर्णय कसा घ्यावा काय घ्यावा याबाबतचा अभ्यास नाही सामाजिक ज्ञान नाही, अशा बिनडोक माणसाची काय बोलावे आणि सरकारही त्यांचे काय ऐकते असा प्रश्न आहे,अशी टिका राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
शुक्रवारी बीडमध्ये सभा झाल्यानंतर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे येवला येथे आले होते त्यावेळी शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना स्थानिक पत्रकारांनी जरांगे यांच्या प्रश्नाबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले की त्यांना कोणतेही ज्ञान नाही सामाजिक बांधिलकी कशी असते ते माहित नाही सामाजिक प्रश्न माहित नाही मग अशा बिनडोक माणसाविषयी काय बोलावे सरकारही अशा व्यक्तीशी कशी चर्चा करते असा प्रश्न आहे असे सडेतोड का करताना भुजबळ पुढे म्हणाले की, जरांगे पाटील हे अतिशय चुकीच्या पद्धतीप्रमाणे वागत आहे सरकारला धारेवर धरत आहे का कोणासाठी मूळ प्रश्न काय ते माहिती आहे का असा प्रश्न भुजबळ यांनी विचारला आहे.
काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की ते कोणाच्या दबावाखाली काम करत आहे घडीत ओबीसी चे नेते म्हणून काम करतात त्यांच्यासाठी मोर्चे करतात तर कधी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बोलत आहेत त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे ते एकदा संपूर्ण समाजाला सांगावे ज्यावेळी सर्व ओबीसी समाजाची बैठक झालेली होती त्यावेळी ते अतिशय आग्रही होते पण त्यानंतर त्यांचा कल बदलला आणि आम्ही वारंवार त्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवले परंतु ते बैठकीला आले नाहीत ना कुठल्या चर्चेच्या व्यासपीठावरती आले नाहीत असे सांगून भुजबळ म्हणाले की विखे पाटीलही अशी का भूमिका घेतात या विषयावरती मला शंका आहे कारण कोणताही विषय घेताना तो मंत्रिमंडळाच्या समोर आला पाहिजे त्यावर चर्चा झाली पाहिजे नागरिकांची मते मागविले केली पाहिजे ही देशाची पद्धत आहे कायद्याने हे ठरवून दिलेले आहे त्याच पद्धतीने हे सर्व वहीला पाहिजे पण ते तसं होत नाही याची खंत देखील यावेळी भुजबळ यांनी केली
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV