लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)आज अहमदपूर येथे दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी इंद्रायणी निवासस्थानी जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून आलेल्या नागरिकांनी भेट घेतली. यावेळी बाबासाहेब पाटील यांनी आलेल्या नागरिकांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या. नागरिकांकडून करण्यात आलेल्या सत्काराचा स्वीकार यावेळी केला. यावेळी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis