बीड, 18 ऑक्टोबर, (हिं.स.) - किल्ले महादुर्ग धारूर, ता. किल्ले धारूर, जि. बीड येथे जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित शिव दीपोत्सव सोहळा २०२५ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उंच डोंगरावर वसलेला हा ऐतिहासिक किल्ला आजही मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देतो. हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळलेला किल्ला आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
बीड जिल्ह्यातील किल्ले महादुर्ग धारूर तालुका किल्ले धारूर येथे झालेल्या कार्यक्रमास बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शौर्य, स्वाभिमान आणि संस्कृतीचा हा दीपोत्सव प्रत्येक मराठी मनात नवचैतन्य निर्माण करणारा ठरला, असे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis