छत्रपती संभाजीनगर येथे युक्तधारा अंतर्गत पंचवार्षिक नियोजन सभा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। ग्रामपंचायत खांडी पिंपळगाव, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर येथे गटविकास अधिकारी श्री. प्रकाश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युक्तधारा अंतर्गत पुढील पंचवार्षिक नियोजन आराखड्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर बैठक आ
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। ग्रामपंचायत खांडी पिंपळगाव, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर येथे गटविकास अधिकारी श्री. प्रकाश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युक्तधारा अंतर्गत पुढील पंचवार्षिक नियोजन आराखड्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर बैठक आयोजित करण्यात आली.

गाव सर्वेक्षण, गाव फेरी व शिवार फेरी दरम्यान विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले. या बैठकीस तालुकास्तरीय सर्व सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, तसेच खांडी पिंपळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच ग्रामपंचायत दुधड येथेही युक्त धारा अंतर्गत पंचवार्षिक नियोजन आराखड्याबाबत ग्रामसभा घेण्यात आली यामध्ये जिल्हा समन्वयक श्री दिपक तंगे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. गाव सर्वेक्षण व शिवार फेरीदरम्यान विविध कामांचे नियोजन करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande