लातूर, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। भाजपा नेते आ रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रेणापूर येथे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तीन कोटी रुपये खर्चाचे इंनडोअर स्टेडियम यासह इतर विकास कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याने रेणापूरच्या विकासात मोठी भर पडणार आहे.
रेणापूर नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्यापासून राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून रेणापूर येथे नवीन पाणीपुरवठा योजना, श्री रेणुका देवी मंदिर भक्तनिवास, अशोक सम्राट बौद्ध विहार, मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना, बालाजी मंदिर परिसरात भव्य सभागृह, रेणा नदीवर घाट विकसित करणे, श्री रेणुका देवी मंदिर परिसर विकासीत करणे, अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर, रेड्डी समाज भवन, हनुमान मंदिर सभागृह, अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, पथदिवे, अंगणवाडी बांधकाम यासह विविध कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातील काही कामे झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत इतर उर्वरित कामाला येत्या काही दिवसात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis