बीड - पंतप्रधानांनी गौरव केलेल्या शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा गेवराईत सत्कार
बीड, 18 ऑक्टोबर, (हिं.स.) - नवी दिल्ली येथे सेंद्रिय शेती बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील शेतीनिष्ठ दोन शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते याची दखल घेत गेवराई
अ


बीड, 18 ऑक्टोबर, (हिं.स.) - नवी दिल्ली येथे सेंद्रिय शेती बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील शेतीनिष्ठ दोन शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते याची दखल घेत गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी या दोन शेतकऱ्यांचा सत्कार केला.

माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या हस्ते तळणेवाडी येथील शेतनिष्ठ शेतकरी तुकाराम बोरकर, शिवराम घोडे आणि अशोकराव पठाडे यांचा यथोचित सत्कार कण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, माजी जि. प.सदस्य संग्राम आहेर, फुलचंद बोरकर, रफिक‌ सौदागर, रामलाल धस आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande