पदवीधराने मतदार नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत योगदान द्यावे : आ. संजय केनेकर
परभणी, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। भाजपकडून सुरू असलेले पदवीधर मतदार नोंदणी अभियान हे लोकशाही बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. परभणीतील प्रत्येक पात्र पदवीधराने या अभियानात सहभागी होऊन मतदार नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन आम
पदवीधराने मतदार नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत योगदान द्यावे : आमदार संजयजी केनेकर


परभणी, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। भाजपकडून सुरू असलेले पदवीधर मतदार नोंदणी अभियान हे लोकशाही बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. परभणीतील प्रत्येक पात्र पदवीधराने या अभियानात सहभागी होऊन मतदार नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन आम्ही सर्व कार्यकर्त्यांमार्फत करत आहोत, पदवीधर मतदार नोंदणी अभियान प्रमुख आमदार संजय केनेकर यांनी केले.

भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियानाला गती देण्यासाठी महानगर कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अभियानाची प्रगती तपासून पुढील टप्प्यातील नियोजन निश्‍चित करण्यात आले. या बैठकीस मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियान प्रमुख आमदार संजय केनेकर, प्रदेश संयोजक प्रा. डॉ. पांडुरंग मांडकीकर, भाजप परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, अभियान संयोजक दिपक टाक, सरचिटणीस भालचंद्र गोरे, शंकर आजेगावकर, मंगलताई मुदगलकर, उपाध्यक्ष रितेश जैन, युवा मोर्चाध्यक्ष अजिंक्य गोंडेस्वार, महिला मोर्चाध्यक्ष मनीषा जाधव, ओबीसी मोर्चाध्यक्ष बबलू टाक, अल्पसंख्यांक मोर्चाध्यक्ष हम्मु चाऊस, अनुसूचित जाती मोर्चाध्यक्ष सुमित भालेराव, तसेच मंडळाध्यक्ष सुरज चोपडे, दिपक देशमुख, जोशी सर, सिकंदर खान, प्रवीण गायकवाड, आकाश कदम, अतुल लंगोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान पदवीधर मतदार नोंदणी अभियानाची सद्यस्थिती, मतदार नोंदणी प्रक्रिया, विभागनिहाय समन्वय आणि जबाबदार्‍या यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या शेवटी उपस्थित पदाधिकार्‍यांनीही अधिकाधिक पात्र पदवीधरांनी मतदार यादीत नावनोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande