पुणे - ‘आयओनिक फॉरेस्‍ट’मध्‍ये 5 लाख वृक्षारोपणाचा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा
पुणे, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडच्‍या सीएसआर शाखेने आज ‘ह्युंडाई आयओनिक फॉरेस्‍ट’ (IONIQ Forest) उपक्रमांतर्गत 5 लाख झाडांच्या यशस्‍वी वृक्षारोपणाची घोषणा केली. हा महत्त्वपूर्ण टप्
पुणे - ‘आयओनिक फॉरेस्‍ट’मध्‍ये 5 लाख वृक्षारोपणाचा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा


पुणे, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडच्‍या सीएसआर शाखेने आज ‘ह्युंडाई आयओनिक फॉरेस्‍ट’ (IONIQ Forest) उपक्रमांतर्गत 5 लाख झाडांच्या यशस्‍वी वृक्षारोपणाची घोषणा केली. हा महत्त्वपूर्ण टप्पा येत्या वर्षभरात डांगे चौक, पिंपरी-चिंचवड येथे 90.5 एकर जमिनीवर 10 लाख झाडे (1 दशलक्ष) लागवडीच्या प्रकल्‍पाच्‍या उद्दिष्टाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्‍यामुळे महाराष्‍ट्र राज्‍यामधील हे सर्वात मोठे शहरी वृक्षारोपण असेल.मावळ मतदारसंघाचे माननीय आमदार श्री सुनील शेळके, श्री. विश्वजीत श्रीरंग बारणे, पशुसंवर्धन विभाग - ताथवडे, पुणे सहाय्यक आयुक्‍त डॉ. रतिकांत नवटाके यांच्या सन्माननिय उपस्थितीत हा क्षण साजरा करण्यात आला.

यावेळी श्री. जेओंगिक ली, फंक्शन हेड - कॉर्पोरेट अफेअर्स, एचएमआयएल, श्री. श्यामकुमार सिंग, फंक्शन लीड - प्रोडक्शन (पुणे) एचएमआयएल, श्री. पुनीत आनंद, एव्हीपी अँड व्हर्टिकल हेड - कॉर्पोरेट अफेअर्स, कॉर्पोरेट कम्‍युनिकेशन्‍स अँड सोशल एचएमआयएल, तसेच एचएमआयएल व ओरिअर्थ नेचर फाउंडेशनचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'मियावाकी' पद्धतीचा वापर करून 1,000 वृक्षारोपणासह आयओनिक फॉरेस्‍ट उपक्रम सुरू करण्यात आला. 'मियावाकी’ पद्धत ही दाट, जलद वाढणारी आणि जैवविविध वन निर्माण करण्यासाठी ओळखली जाते. या प्रकल्पात 41 स्थानिक वृक्ष प्रजातींचा वापर करण्‍यात आला आहे, ज्यामुळे पर्यावरण शाश्वतेची खात्री मिळेल आणि पक्षी, कीटक व इतर प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण करून जैवविविधतेला चालना मिळेल.हा उपक्रम लोकसहभागाशी अधिक जोडलेला आहे, ज्यामध्ये शाश्वत पर्यावरणीय पद्धतींवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले असून, याचा नागरिक व पर्यावरण दोघांना फायदा होईल. पुढील पाच वर्षांमध्‍ये हे जंगल जवळपास 63,000 टन कार्बन डायऑक्‍साइड वायू शोषून घेण्‍याचा अंदाज आहे, ज्याचा पर्यावरण शाश्वतता आणि सर्वसमावेशक वाढीवर मोठा परिणाम होईल. या प्रकल्‍पाद्वारे आदिवासी समुदायांमधील 100 हून अधिक कुटुंबांसाठी हरित रोजगार उपलब्ध झाले आहेत, यासह इकोसिस्टीम पुनर्स्थापन, शाश्वत जमीन व्यवस्थापन आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग व चेक डॅमच्या माध्‍यमातून जलसंवर्धनलाही चालना देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande