सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळांची होणार तपासणी
सोलापूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील दिव्यांग शाळेत अनियमितता असल्याची तक्रार आली आहे. त्यामुळे सर्व दिव्यांग शाळांची तपासणी करून, त्याचा अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे पाठवावा, असे पत्र दिव्यांग आयुक्त समीर कुर्तकोटी यांनी जिल्हा परिषदेचे
सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग शाळांची होणार तपासणी


सोलापूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील दिव्यांग शाळेत अनियमितता असल्याची तक्रार आली आहे. त्यामुळे सर्व दिव्यांग शाळांची तपासणी करून, त्याचा अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे पाठवावा, असे पत्र दिव्यांग आयुक्त समीर कुर्तकोटी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांची तपासणी होणार आहे.

दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या शाळांमध्येदेखील अनियमितता असल्याच्या तक्रारी दिव्यांग आयुक्त कार्यालयाकडे केल्या आहेत. बोगस पदमान्यता, बनावट विद्यार्थ्यांची प्रत्यक्षात पाहणी न करता अनुदान वितरण केल्याचा प्रकार जिल्हा समाजकल्याण विभागाकडून होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांग शाळांची तपासणी करावी, अशी मागणी प्रमोद कलशेट्टी यांनी दिव्यांग आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार दिव्यांग आयुक्तांनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांची तपासणी करून अहवाल पाठवावे, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांना दिले आहेत. त्यानुसार आता जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांची तपासणी येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande