सोलापूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
नान्नज जिल्हा परिषद गट आरक्षित झाल्यामुळे माजी अध्यक्ष बळिराम साठे यांची अडचण झाली आहे. कार्यकर्ते मात्र साठे यांना बीबी दारफळ गटातून उभे राहण्याचा आग्रह करत आहेत. याबाबत आपण सारासार विचार केल्यानंतरच निर्णय घेऊ, अशी घोषणा बळिराम साठे यांनी केले आहे. शासकीय विश्रामगृहावर साठे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी ही मागणी केली राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळिराम साठे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, माजी उपसभापती जितेंद्र शीलवंत, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नागेश पवार आदी उपस्थित होते.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी बळिराम साठे यांनी बीबीदारफळ जिल्हा परिषद गटातून आपली उमेदवारी जाहीर करावी असा आग्रह धरला. यावेळी साठे म्हणाले, अद्याप आपण उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला नसून सर्व कार्यकर्त्यांशी बोलून याबाबत निर्णय घेऊ. त्याचबरोबर कुठल्याही पक्षाबरोबर युती न करता स्थानिक समविचारी लोकांशी आघाडीबाबत चर्चा करावी, असेही यावेळी साठे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड