भाजपाच्या लातूर येथील बैठकीत जिल्हा स्तरावरील संघटनात्मक कार्याचा सखोल आढावा
लातूर, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। लातूर येथे भारतीय जनता पक्षाच्या ''भाजप जिल्हा पदाधिकारी व पदवीधर जिल्हा संयोजक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने जिल्हा स्तरावरील संघटनात्मक कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने
अ


लातूर, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। लातूर येथे भारतीय जनता पक्षाच्या 'भाजप जिल्हा पदाधिकारी व पदवीधर जिल्हा संयोजक बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने जिल्हा स्तरावरील संघटनात्मक कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील संयोजनाला अधिक प्रभावी करण्यावर तसेच मतदार नोंदणी वर सविस्तर चर्चा करण्यात आली.

​पक्षीय ध्येयधोरणे आणि लोकहिताचे मुद्दे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा आणि संघटनेला अधिक बळकट करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर विभाग संघटन मंत्री संजय कौडगे,राहुल लोणीकर आ. गोविंद अण्णा केंद्रे, गुरुनाथ मघे, लातूर महानगर अध्यक्ष अजित कव्हेकर, नोंदणी प्रमुख युवराज चाकूरकर, अमोल निडवदे, यांच्यासह जिल्ह्यातील मंडळ अध्यक्ष जिल्ह्यातील आणि तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, सर्व मंडळ मतदार नोंदणी प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande