छ. संभाजीनगर - धोत्रा येथील ग्रामस्थांचे उपोषण आमदार सत्तार यांनी सोडवले
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)धोत्रा ता. सिल्लोड येथील ग्रामसेवकाने ग्रामसभेत घेतलेला ठराव रद्द करावा, ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासह ग्रामसेवकाच्या विविध तक्रारी संदर्भात धोत्रा येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)धोत्रा ता. सिल्लोड येथील ग्रामसेवकाने ग्रामसभेत घेतलेला ठराव रद्द करावा, ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासह ग्रामसेवकाच्या विविध तक्रारी संदर्भात धोत्रा येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते.

पंचायत समिती कार्यालयासमोर या उपोषण स्थळी आमदार अब्दुल सत्तार.यांनी भेट देऊन धोत्रा ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा केली.आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिकेवर विश्वास ठेवून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. विनंतीला मान देऊन दिलेल्या आश्वासानंतर त्यांनी आपले उपोषण स्थगित केले. याबद्दल त्यांचे आमदार सत्तार यांनी आभार व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande