परभणी, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। दीपावलीच्या आनंददायी पार्श्वभूमीवर मौजे सिंगणापूर (ता. परभणी) येथे सरपंच चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या भव्य स्पर्धेचे उद्घाटन खासदार संजय जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) परभणी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव, तसेच जिल्हा प्रमुख रवींद्र धर्म यांची विशेष उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. ३१,००० रोख रक्कम व सन्मानचिन्ह, तसेच द्वितीय पारितोषिक रु. २१,००० रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, सामने रोमांचक वातावरणात सुरू आहेत. सरपंच पांडुरंग खिल्लारे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून या सरपंच चषक २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले तर उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत, खेळातून बंधुभाव आणि आरोग्यदायी स्पर्धेचा संदेश दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis