नाशिक, 18 ऑक्टोबर (हिं.स.) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण, नोकरीसाठी विद्यापीठामार्फत प्रतिलेखे (Transcript) देण्यात येतात. सदर प्रतिलेखे प्रचलित नियमानुसार ऑफलाईन पध्दतीने देण्यात येत असे. तथापि दिवसांगणिक तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या सुधारणा/शोधामुळे परीक्षा विभागाचेही संपूर्ण ऑटोमेशन करण्यात येत आहे. त्यापैकी, विद्यार्थ्यांना प्रतिलेखे देण्यासाठी ऑनलाईन Student Portal तयार करण्याबाबतचा विद्यापीठाचा मानस होता.
त्याअनुषंगाने परीक्षा नियंत्रक डॅा. संदीप कडू, सहाय्यक कुलसचिव प्रमोद पाटील, संगणक आज्ञावलीकार श्री. सचिन धेंडे, कक्ष अधिकारी श्रीमती ज्योती इटनकर यांच्या सहमार्गदर्शनाने एस.एस.एम.बी. प्रा. लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक श्री. बालसुब्रमण्यम, संगणक आज्ञावलीकार श्री. सुशील लल्ला आणि इतर कर्मचारी यांचेद्वारे प्रतिलेखे देण्यासाठी ऑनलाईन Student Portal तयार करण्यात येवून नुकतेच कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी