महिलांची पतसंस्था स्थापन करण्यासाठी राज्यमंत्री बोर्डीकर यांनी घेतली बैठक
नांदेड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची पतसंस्था स्थापन करण्याबाबत विविध विभागांची आढावा बैठक घेतली.या बैठकीत आमदार श्रीजयाताई चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर,
अ


नांदेड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची पतसंस्था स्थापन करण्याबाबत विविध विभागांची आढावा बैठक घेतली.या बैठकीत आमदार श्रीजयाताई चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, उमेद महिला बचत गट आणि खाजगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पतसंस्था स्थापन होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या प्रक्रियेला गती देऊन १५ नोव्हेंबरपर्यंत पतसंस्था स्थापन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.तसेच या प्रसंगी 28 व्या राष्ट्रीय पोषण महादरम्यान राबविलेल्या उपक्रमांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन माझ्या तसेच आमदार श्रीजया चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande