लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर शाखेच्या वतीने राजर्षी शाहू महाविद्यालयाची कार्यकारणी घोषणा करण्यात आली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर शाखेच्या वतीने राजर्षी शाहू महाविद्यालयाची कार्यकारणी महाविद्यालय अध्यक्ष म्हणून रुद्राक्ष सुतार,उपाध्यक्ष म्हणून नम्रता पालीवाल,मंत्री म्हणून किशोर मगर,सहमंत्री म्हणून दत्ता सोनकांबळे तसेच गतिविधीची कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली.
यावेळी महानगर कार्यालय मंत्री विशाल ममदापुरे, पूर्वनगर मंत्री स्नेहल चव्हाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis