छत्रपती संभाजीनगर, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। फुलंब्री येथील हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी शेती कामासाठी मोठ्या प्रमाणात फर्ग्युसन कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी करात केलेल्या कपातीमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असून ट्रॅक्टर मशीनवर तब्बल ७३ हजार रुपयांची सूट मिळाली. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत १.५ लाख रुपयांचे अनुदान मिळून प्रत्येक शेतकऱ्याला एकूण २ लाख रुपयांहून अधिक लाभ मिळाला आहे.
महाडीबीटी योजनेतून कृषी यांत्रिकीकरणासाठी राज्यभरात तब्बल ३२ लाखांवर लाभार्थी निवडले गेले आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागातील शेती उत्पादनक्षमतेला मोठी चालना मिळेल.
शेतकऱ्यांवर कोणतेही संकट आले तरी केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे हा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे.असे आमदार अनुराधा चव्हाण यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis