लातूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर च्या वतीने विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले.
मंडळाच्या वतीने यावर्षी,निबंध स्पर्धा,भजन स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,संविधान उद्देशिका लेखन स्पर्धा,गीतगायन स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा,मातीपासून गणपती मूर्ती तयार करणे स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,रिल्स स्पर्धा, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी मनोज दादा पुदाले, बाळासाहेब पाटोदे, अभिजीत औटे, डॉक्टर बसवराज स्वामी, नितीन लोहकरे, संतोष बिरादार किनीकर, यशवंत पाटील बेळ सांगवी, विस्ताराधिकारी तोटे , दत्ता पाटील छावा शेल्हाळकर, विविध स्पर्धेत सहभागी झालेले सर्व स्पर्धक यावेळी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis