नाशिक, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। येवला बाजार समितीत शेतकरी भवन निर्माण करण्यासाठी १.५० कोटी निधी दिला जाईल.याचा प्रस्ताव बाजार समितीने तातडीने पाठवावा. त्याचबरोबर कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर प्रकल्प उभारण्यात येत आहे. तसेच डोंगरगाव उपबाजारासाठी १ रुपये दराने जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर मदत उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना अधिक सुविधा देण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी मारोतीराव पवार,तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सहायक निबंधक राजपूत, उपाध्यक्ष अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे,अरुणमामा थोरात, वसंत पवार, संभाजी पवार, बाजार समितीच्या सभापती सविता पवार, उपसभापती संध्या पगारे,रायभान काळे, यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV