पुणे, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। पुणे महापालिकेतील हस्तांतरणीय विकास हक्क (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स - टीडीआर) प्रक्रिया पूर्ण होण्यास अनेक महिने लागत होते, पण आता कमी कागदपत्रांसह ही प्रक्रिया सुटसुटीत केली आहे. ९० दिवसांत ‘टीडीआर’ची फाइल मंजूर करायची, असे आदेश आयुक्त नवलकिशोर राम यांनी काढले आहेत. एक नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.महापालिकेच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना भूसंपादन करताना प्रशासनाकडून जागा मालकांनी ‘टीडीआर’ किंवा ‘एफएसआय’ (चटई क्षेत्र निर्देशांक) घ्यावा यासाठी आग्रह केला जातो.
महापालिकेत बांधकाम विभागात खास ‘टीडीआर’ सेल आहे. तेथे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर बांधकाम विभाग, विधी विभाग, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, अतिरिक्त आयुक्त कार्यालय, दक्षता विभाग आणि त्यानंतर आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर ‘टीडीआर’ची फाइल मंजूर होते, पण ‘टीडीआर’चा प्रस्ताव दाखल केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांना, आर्किटेक्चर किंवा संबंधित अन्य व्यक्तींना महापालिकेत भरपूर खेटे मारावे लागतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु