रेबीजमुक्तीसाठी पुणे महापालिकेचा पुढाकार
पुणे, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील वाढत्या श्‍वानदंशाच्या घटनांना आळा घालण्यासाठी भटक्‍या श्‍वानांचे लसीकरण करण्याबरोबरच भटक्‍या श्‍वानांना जीपीआर मायक्रोचिप बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दिल्ली, गोव्यापाठोपाठ आता पुण्यातही हा उपक्रम राब
रेबीजमुक्तीसाठी पुणे महापालिकेचा पुढाकार


पुणे, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील वाढत्या श्‍वानदंशाच्या घटनांना आळा घालण्यासाठी भटक्‍या श्‍वानांचे लसीकरण करण्याबरोबरच भटक्‍या श्‍वानांना जीपीआर मायक्रोचिप बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दिल्ली, गोव्यापाठोपाठ आता पुण्यातही हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यानुसार, महापालिकेच्या हद्दीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ६०० श्‍वानांना मायक्रोचिप बसविली जाणार आहे. पुढील आठवड्यापासून मायक्रोचिप बसविण्यास सुरुवात केली जाणार आहे.केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार, महापालिकेने २०३० पर्यंत शहर रेबीजमुक्त करण्याचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. मागील काही दिवसांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांत लहान मुलांना श्‍वानदंशाच्या घटना घडल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande