सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी
सोलापूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीनिमित्ताने खरेदीसाठी अनेकांच्या घरात दागिने, रोकड मोठ्या प्रमाणावर असते. सणासुदीत चोरी, दरोड्याच्या घटना होत असतात. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक रस्त्यावर रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत विशेष नाकाबंदी लावण्
सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी


सोलापूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीनिमित्ताने खरेदीसाठी अनेकांच्या घरात दागिने, रोकड मोठ्या प्रमाणावर असते. सणासुदीत चोरी, दरोड्याच्या घटना होत असतात. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक रस्त्यावर रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत विशेष नाकाबंदी लावण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला आहे.सोलापूर शहरात विजापूर नाका, एमआयडीसी, जेलरोड, जोडभावी पेठ, फौजदार चावडी, सदर बझार आणि सलगर वस्ती अशी ७ पोलिस ठाणी आहेत. या पोलिस ठाण्याअंतर्गत प्रत्येकी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने दररोज त्यांच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी लावायची आहे. बॅरिकेटिंग लावून हे पथक त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करेल.कायदा किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याशिवाय गुन्हे देखील दाखल होतील, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे. दोन दिवसांपूर्वी विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीत सोरेगाव-डोणगाव क्रॉस रोडवर नाकाबंदी लावली होती. त्यावेळी एका कारची झडती घेतल्यावर त्यात धारदार तलवार आढळून आली. त्या कारचालकावर गुन्हा दाखल केल्याचेही पोलिस आयुक्तांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande