परभणीत वऱ्हाड निघालयं लंडनला या एकपात्री नाटकाचा प्रयोग
परभणी, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात रविवार दिनांक 19 ऑक्टोबरला संदीप पाठक प्रस्तुत वऱ्हाड निघालयं लंडनला या एकपात्री नाटकाचा प्रयोग होणार आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या वा
वऱ्हाड निघालयं लंडनला या एकपात्री नाटकाचा प्रयोग आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य


परभणी, 18 ऑक्टोबर (हिं.स.)। आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात रविवार दिनांक 19 ऑक्टोबरला संदीप पाठक प्रस्तुत वऱ्हाड निघालयं लंडनला या एकपात्री नाटकाचा प्रयोग होणार आहे.

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता शहरातील कोचिंग क्लासेस तसेच वस्तीगृह संचालक आणि मेस्टा संघटनेतील शिक्षक यांचा सपत्नीक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानंतर लगेचच संदीप पाठक प्रस्तुत वऱ्हाड निघालय लंडनला या एकपात्री नाटकाचा प्रयोग होणार आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम जामकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande