बीड, 18 ऑक्टोबर (हिं.स.)गेल्या सहा दिवसांपासून माजलगाव मतदारसंघातील आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी या जमातींच्या न्यायहक्कासाठी समाजबांधव कास्ट सर्टिफिकेट मिळण्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले आहेत. गेल्या सहा दिवसापासून या समाज बांधवांचे उपोषण सुरू आहे मात्र प्रशासनाने अद्यापही याकडे लक्ष दिलेले नाही. प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणताही अधिकारी उपोषण स्थळी आलेला नाही.परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजलगाव येथील नेते मोहन जगताप यांनीआज उपोषणस्थळी भेट देऊन संबंधित उपविभागीय अधिकारी, माजलगाव तसेच बीडचे कलेक्टर यांच्याशी सविस्तर चर्चा करून विषयाबाबत लवकरात लवकर सकारात्मक तोडगा निघावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. हे उपोषण तात्काळ सोडवण्यात यावे असे बीड जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी कळवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis