सोलापूर, 18 ऑक्टोबर (हिं.स.)।
अहंकार असेल तिथे प्रेम भक्ती राहात नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पु ना गाडगीळ यांच्या सहकार्याने आयोजित विवेकाची अमृतवाणी च्या दुसर्या दिवशी ते बोलत होते. प्रारंभी चौधरी फौंडेशनचे अध्यक्ष चेतन चौधरी यांच्या हस्ते निरूपणकार विवेक घळसासी यांना पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले आणि दुसर्या दिवसाच्या प्रवचनाला लोकमान्य टिळक सभागृह अॅम्फी थिएटर मध्ये सकाळी 6.25 वाजता प्रारंभ झाला.
ज्याचे मन निर्मळ असते त्याला भगवंत प्राप्ती सहज होते. साधना, साध्य हाच भक्ती मार्ग आहे. प्रेमाचा वायदा असतो तिथे भेद मिटतो. परिवर्तन हीच नित्य गोष्ट आहे. साधनेतून परम परमार्थाचा मार्ग आहे. असेही त्यांनी सांगितले. श्रीनारद भक्तीसूत्र हाच आत्मशुध्दीतून भगवान प्राप्तीची पहिली पायरी आहे. सनातन धर्मात परोपकार आणि साधना ही महत्वाचे आहे. अंर्तमनात निर्माण झालेला पूर्णभाव, प्रेम गुणरहित आहे. असेही श्रीनारद भक्ती सुत्रात सांगितल्याचे ते म्हणाले. तीन दिवसाच्या विवेकाची अमृतवाणी दिवाळीपूर्व निरूपणाचे दुसर्या दिवसाचे प्रवचन आयोजन करण्यात आले होते. रविवार दि. 19 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6.25 ते 7.25 यावेळेत या तीन दिवशीय विवेकाची अमृतवाणीचे प्रवचन होवून समारोप होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड