सोलापूर - अतिवृष्टीची भरपाई सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर
सोलापूर, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्यातील ३३ जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टी व महापुरामुळे एकाच महिन्यात तब्बल ५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले असून कृषी विभागाकड
सोलापूर - अतिवृष्टीची भरपाई सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर


सोलापूर, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्यातील ३३ जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टी व महापुरामुळे एकाच महिन्यात तब्बल ५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले असून कृषी विभागाकडूनही एकूण अहवाल रात्री उशिरा राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वितरित होण्याची शक्यता आहे.बीड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, बुलडाणा, हिंगोली, परभणी, अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यांना सप्टेंबरमध्ये पूर व अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला.

शेतकऱ्यांची उरलीसुरली आशा पाण्यात वाहून गेली. दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा होईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांनी दिले. पण, अजूनही २० पेक्षा अधिक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दमडीही मिळालेली नाही. अतिवृष्टी, पुरामुळे बाधितांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भरपाईची रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande