सोलापूर - समर्थ बॅंकेकडून विमा संरक्षणप्राप्त ठेवींसाठी अर्ज घेण्यास सुरवात
सोलापूर, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)समर्थ सहकारी बॅंकेतील ५ लाखांच्या आतील ठेवी देण्यासाठी अर्ज वाटपास सुरूवात करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी १ नंतर सर्वच शाखांमध्ये अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. दिवाळीसाठी तातडीची व वैद्यकीय कारणास रक्कम काढण्यासाठी
सोलापूर - समर्थ बॅंकेकडून विमा संरक्षणप्राप्त ठेवींसाठी अर्ज घेण्यास सुरवात


सोलापूर, 18 ऑक्टोबर, (हिं.स.)समर्थ सहकारी बॅंकेतील ५ लाखांच्या आतील ठेवी देण्यासाठी अर्ज वाटपास सुरूवात करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी १ नंतर सर्वच शाखांमध्ये अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. दिवाळीसाठी तातडीची व वैद्यकीय कारणास रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने अद्याप परवानगी दिली नाही, आम्ही रिझर्व्ह बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी सांगितले.५ लाखापर्यंतच्या विमा संरक्षण ठेवी देण्यासाठी डीआयसीजीसीने अर्ज स्वीकारण्याच्या सूचना दिल्यानंतर शुक्रवारपासून बॅंकेने अर्ज स्वीकारण्यास सुरूवात केली आहे.

सोलापुरातील ८ शाखांसह इतर शहरातील शाखांमध्ये विमा संरक्षण ठेवीसाठी अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. बॅंकेत दीड लाख ठेवीदारांच्या ६७० कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. ज्या ठेवीदारांच्या ठेवी आहेत, त्यांना ५ लाख रूपयापर्यंतची रक्कम मिळण्यासाठी अर्जासोबत बॅंक खाते क्रमांक, आधार कार्ड, ठेवी पावतीसह इतर १२ प्रकारची कागदपत्रे जोडून अर्ज द्यावा लागणार आहे. ही सर्व माहिती बॅंकेकडून डीआयसीजीसीच्या पोर्टलवर भरण्यात येणार आहे. सर्व ठेवीदारांची माहिती २१ नोव्हेंबरपर्यंत भरण्याचे आदेश आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande