बीड : अभ्यागत मंडळावर सात अशासकीय सदस्यांची नियुक्ती
बीड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळावर ७ अशासकीय सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात वैद्यकी
अ


बीड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळावर ७ अशासकीय सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत.

या संदर्भात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी खा. बजरंग सोनवणे, विद्यमान आ. नमिता मुंदडा, राष्ट्रीय वर्तमान पत्राचा प्रतिनिधी म्हणून वसंत मुंडे (बीड), प्रतिष्ठीत महिला मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून अंजली घाडगे (केज), प्रतिष्ठीत महिला प्रतिनिधी म्हणून संजिवनी देशमुख (अंबाजोगाई), प्रतिष्ठीत सामाजिक पुरुष कार्यकर्ते म्हणून राजकिशोर मोदी (अंबाजोगाई), सामाजिक पुरुष कार्यकर्ते म्हणून माजी आमदार संजय दौंड यांचे निवड करण्यात आली आहे.

याशिवाय पदसिद्ध सदस्य म्हणून अधिष्ठाता, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, उप संचालक आरोग्य सेवा, नगर पालिका आरोग्य समितीचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयातील १ विभाग प्रमुख, वैद्यकीय महाविद्यालयाचा १ कर्मचारी प्रतिनिधी अशा पाच सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शासन निर्णयावर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे कार्यासन अधिकारी निलेश साळुंखे यांची स्वाक्षरी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande